संत नामदेव महाराजांच्या स्मारकास जागा देण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी आणि कामास गती द्यावी, अशी मागणी नामदेव समाजोन्नती परिषदेने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेन नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात परिषदेने म्हटले आहे की, सन 2014 मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या परिषदेच्या अधिवेशनात पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक व्हावे. यासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावर्षी महाराजांची 750 वी जयंती असून पंढरपूरात 65 एकर जागेत किंवा रेल्वेची 15 एकर जागा या दोन्हींमध्ये त्वरीत उपलब्ध असलेल्या जागेवर वाटप किंवा क्षेत्र निश्चित करुन मंजुरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी महसूल मंत्री थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याकडे परिषदेचे प्रभारी अध्यक्ष संजीव तुपसाखरे, उपाध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ.अजय फुटाणे, बाळासाहेब खर्डे, रवी रहाणे, अशोक कालेकर, पत्रकार सदाशिव मुळे, किरण वाघ, धनंजय खर्डे, राहुल खर्डे, संतोष गंगावणे, सोमनाथ अवसरकर, संजय चांडोले आदी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
