निवडणुका जिंकण्यासाठी बूथ संपर्क अभियान चांगले राबवा ः गोंदकर अकोले भाजप कार्यालयात बूथरचना संपर्क अभियानाची बैठक उत्साहात

नायक वृत्तसेवा, अकोले
बूथरचना भाजपचा आत्मा असून बूथप्रमुख हा महत्वचा घटक आहे. आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी बूथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने राबवा असे आवाहन भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.

अकोले येथील भाजप कार्यालयात आयोजित बूथरचना संपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष गोंदकर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, ज्येष्ठ नेते वसंत मनकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले तालुका बूथ संपर्क अभियान संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, युवा अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा सदस्य धनंजय संत आदी उपस्थित होते.
![]()
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सुद्धा बूथप्रमुख आहेत. त्यामुळे कोणतेही पद लहान नाही ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या न्यायाने आपले बूथ मजबूत केले तर कोणतीही निवडणूक आपण हरणार नाही. यासाठी प्रत्येक बूथची दर महिन्याला बैठक घ्यावी, असे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी सूचित केले.

दरम्यान, ज्येष्ठ व्यापारी अनिल भळगट यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप किसान मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीसपदी सुरेश गभाले, उपाध्यक्ष नरेंद्र नवले, सचिव विठ्ठल कानवडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्तविक भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर सूत्रसंचालन सरचिटणीस हितेश कुंभार यांनी केले. या बैठकीस नगरसेवक सुरेश लोखंडे, विजय सारडा, परशुराम शेळके, अमोल वैद्य, शरद नवले, भाऊसाहेब बाळसराफ, सुरेश गायकवाड, अमोल येवले, अनिल कोळपकर, रोहिदास जाधव, गोकुळ वाघ, विजय पवार, गोविंद झिंझुरडे, संतोष भाटे, राजू भांगरे, संदीप दातखिळे, सचिन गवारी आदी उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष सचिन शेटे यांनी आभार मानले.
