विटारा ब्रेझा अवघ्या साडेपाच लाख गाड्यांच्या विक्रीसह आघाडीवर
विटारा ब्रेझा अवघ्या साडेपाच लाख गाड्यांच्या विक्रीसह आघाडीवर
नायक वृत्तसेवा, नगर
भारतातील अव्वल क्रमांकाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी विटारा ब्रेझा अवघ्या 4.5 वर्षात 5.5 लाख गाड्यांच्या विक्रीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. कोणत्याही कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या तुलनेत ही सर्वाधिक वेगवान प्रगती आहे. 2016च्या सुरुवातीला सादर झालेल्या विटारा ब्रेझाने या विभागात एरव्ही दुर्मिळ असणार्या ग्लॅमरस लुकमुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात एक नवी क्रांती घडवली. लुक्स, परफॉर्मन्स आणि गाडी चालवण्यातली सहजता असं सर्व काही एकत्र असल्याने या गाडीने अगदी लगेचच समीक्षक आणि ग्राहकांची मने जिंकली. अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ब्रँड विटारा ब्रेझाची रचना अगदी विचारपूर्वक, कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या अनोख्या जीवन पद्धतीला साजेशी अशीच करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या वेगाने बदलणार्या गरजांना त्याच पद्धतीने प्रतिसाद देत नव्या विटारा ब्रेझाला यंदाच्या 2020 ऑटो एक्सपोमध्ये नव्या स्वरुपात सादर करण्यात आले. आता ही गाडी दमदार आणि शक्तीशाली अशा 4 सिलेंडर 1.5 लि.के-सीरिज बीएस-6 पेट्रोल इंजिनासह सज्ज आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळवणार्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमुळे तुम्हाला ताकद, स्पोर्टीनेस आणि गाडी चालवण्याचा अतुलनीय अनुभव असा सुयोग्य मेळ मिळेल. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव या यशाबद्दल बोलताना म्हणाले, विटारा ब्रेझाने अगदी सुरुवातीपासूनच कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात आपले वर्चस्व राखले आहे. एक ट्रेंड सेंटर म्हणून आपली ठळक आकर्षक डिझाईन, दमदार परफॉर्मन्स आणि स्पोर्टी व्यक्तिमत्त्वामुळे ही गाडी सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आणि तिने विक्रीच्या आकड्यांमध्येही वर्चस्व राखले. अनोखे डिझाईन आणि अप्रतिम रचना यामुळे ब्रेझाला या विभागातील इतर गाड्यांच्या तुलनेत वेगळेपण लाभले आणि त्यामुळे ती यशस्वी झाली.

