संगमनेर तालुका पोहोचला सोळाव्या शतकाच्या उंबऱ्यात! तालुक्याच्या बाधित संख्येत आजही पडली 42 रुग्णांची भर!!

नायक वृत्तसेवा, संगमनेर

तालुक्यात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण सापडण्याची श्रृंखला अद्यापही कायम असून दररोजच्या हलत्या कोविड रुग्ण फलकामुळे बाधितांच्या संख्येने दिड शतक ओलांडले आहे. आजही या कडीत पुन्हा एकदा भर पडली असून शासकीय व खासगी प्रयोगशाळा तसेच रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा करण्यात आलेल्या तपासणीत नव्याने 42 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याचा कोविड फलक आजही हलताच राहीला असून रुग्णसंख्येने आता सोळाव्या शतकाचा उंबरा गाठीत 1 हजार 595 रुग्णसंख्या जवळ केली आहे. 

     गेल्या आठवड्यात मंगळवार 18 ऑगस्टपासून संगमनेरच्या कोविड रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मागील आठवड्यातील सोमवार 17 ते रविवार 23 ऑगस्ट या सात दिवसांच्या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत 161 रुग्णांची भर पडली व तिघांचा मृत्यु झाला. तर या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सोमवार 24 ऑगस्टपासून आज अखेर अवघ्या पाचच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 222 रुग्णांची भर पडली. त्यातील बुधवारी (ता.26) एकाच दिवशी तीन टप्प्यात तब्बल 84 रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने तालुक्यात कोविडची दहशत निर्माण झाली आहे. 

     या आठवड्याच्या पहिल्या दिवसाने सुरु केलेली रुग्णवाढीची श्रृंखला चढत्या क्रमाने आजही कायम असून आज प्रशासनाने केलेल्या रॅपिड चाचणीतून 25, शासकीय प्रयोगशाळेतील एक तर खासगी प्रयोगशाळेतून 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार परिसरातील बाधिताच्या संपर्कात आलेल्या 45 वर्षीय महिलेला संक्रमण झाले आहे.

 

त्यासोबतच खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील मालदाड रोड परिसरातील 64 वर्षीय इसम, स्वामी समर्थ नगर परिसरातील 40 वर्षीय तरुण, उपासनी गल्लीतील 35 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, गणेशनगर परिसरातील 34 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाधित असल्याचे समोर आले आहे. याच अहवालातून तालुक्यातील निमोण येथील 52 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 57 वर्षीय पुरुष, कवठे धांदरफळ येथील 55 वर्षीय पुरुष, कनोली येथील 50 वर्षीय पुरुष, जाखुरी येथील 36 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध पुरुष व 38 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तर प्रशासनाने केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील शिवाजीनगर परिसरातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. उर्वरीत सर्व अहवाल तालुक्यातील आहेत. त्यात कवठे कमळेश्वर येथील 24 वर्षीय तरुण, आभाळवाडी येथील 29 वर्षीय तरुण, बोटा येथील 65, 36, 34 व 31 वर्षीय पुरुषांसह 27, 24 व 16 वर्षीय तरुणींचे अहवालही पॉझिटिव आले आहेत. तालुक्यातील चंदनापुरीत कोविडचा उद्रेक झाला असून आजही तेथील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 40, 36, 25, 26 व 24 वर्षीय महिलांसह 32 वर्षीय तरुण, 13 व सात वर्षीय बालक व तीन वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

यासोबतच शिबलापुर येथील 42 वर्षीय व वीस वर्षीय तरुण, पानोडी येथील 27 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, शहराच्या लगत असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील केशवनगर परिसरातील 27 वर्षीय महिलेसह पाच वर्षीय बालकाला संक्रमण झाले आहे. आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत  तब्बल 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची बाधित संख्या 1 हजार 595 वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड टेस्ट लॅबमधून समोर आले १३० रुग्ण..! 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातून ७१, पाथर्डी तालुक्यातील ०९, नगर ग्रामीण ११, अहमदनगरच्या लष्करी क्षेत्रातील ०३, नेवासा तालुक्यातील ०२, पारनेर तालुक्यातील ०७, राहुरी तालुक्यातील १३, शेवगाव तालुक्यातील ०१, कोपरगाव तालुक्यातील ०३, जामखेड तालुक्यातील ०२, कर्जत तालुक्यातील ०१, लष्करी रुग्णालयातील ०६ आणि इतर जिल्ह्यातील ०१ रुग्ण आढळून आले आहेत.

रॅपिड एंटीजन चाचणीतून जिल्ह्यात वाढले 197 नवीन रुग्ण..!

अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत आज १९७ रुग्णांची भर पडली. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २०, संगमनेर तालुक्यातील २३, राहाता तालुक्यातील २२, पाथर्डी तालुक्यातील १२, श्रीरामपुर तालुक्यातील २४, नेवासा तालुक्यातील १८, श्रीगोंदा तालुक्यातील १२, अकोले तालुक्यातील ०४, राहुरी तालुक्यातील ०२, कोपरगाव तालुक्यातील ३४, जामखेड तालुक्यातील १४ आणि कर्जत तालुक्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून जिल्ह्यात वाढले २१८ रुग्ण..!

यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातून ११४, संगमनेर तालुक्यातून १२, राहाता तालुक्यातून २२, पाथर्डी तालुक्यातून ०१, नगर ग्रामीण मधून १२, श्रीरामपुर तालुक्यातून २६, अहमदनगरच्या लष्करी क्षेत्रातून ०३, नेवासा तालुक्यातून ०५, पारनेर तालुक्यातून ०६, अकोले तालुक्यातून ०४, राहुरी तालुक्यातून ०५, शेवगाव तालुक्यातून ०१, कोपरगांव तालुक्यातून ०३, जामखेड तालुक्यातून ०२ व कर्जत तालुक्यातून ०२ रुग्ण समोर आले आहेत.

उपचारांती बरे झालेल्या 575 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज ..!

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोविड केअर हेल्थ सेंटर मधून आज ५७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २२५, संगमनेर तालुक्यातील २३, राहाता तालुक्यातील २९, पाथर्डी तालुक्यातील २२, नगर ग्रामीणमधील ४९, श्रीरामपूर तालुक्यातील ३०, अहमदनगरच्या लष्करी क्षेत्रातील १५, नेवासा तालुक्यातील १९, श्रीगोंदा तालुक्यातील २५, पारनेर तालुक्यातील २६, अकोले तालुक्यातील १७, राहुरी तालुक्यातील २०, शेवगाव तालुक्यातील १३, कोपरगाव तालुक्यातील २८, जामखेड तालुक्यातील २२, कर्जत तालुक्यातील ०४ व लष्करी रुग्णालयातील ०७ रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या : १६ हजार २११
  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रूग्ण : ३ हजार ४६४
  • जिल्ह्यातील एकूण मृत्यू : २७८
  • जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या : १९ हजार ९५३
  • रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण ८१.२५ टक्के
  • आज नव्या ५४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *