संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे साळावे शतक! शहरातील पंधरा जणांसह सत्तेचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या मानगुटावर बसलेल्या कोविडच्या विषाणूंचा दररोज जोरदार हल्ला सुरुच आहे. मोठ्या कालावधीनंतर शुक्रवारी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातून संगमनेर तालुक्यातील तब्बल 47 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातून घुलेवाडी व रहिमपूरमध्ये कोविडचा उद्रेक झाला आहे. एकाच प्रयोगशाळेतून एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर आल्याने तालुक्यातील बाधितांच्या संख्येने सोळावे शतकही ओलांडले असून आज सकाळीच तालुक्याच्या रुग्णसंख्येने 1 हजार 642 वर मजल मारली आहे. संगमनेरसह आज जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही तब्बल दोनशे रुग्णांची भर पडली आहे.


शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहराच्या रुग्णसंख्येत तब्बल 42 रुग्णांची भर पडली होती. त्यात 45 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 64 वर्षीय इसम, स्वामी समर्थ नगर परिसरातील 40 वर्षीय तरुण, उपासनी गल्लीतील 35 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, गणेशनगर परिसरातील 34 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 55 वर्षीय इसमासह 34 वर्षीय तरुण, पावबाकी रस्त्यावरील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 52 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 57 वर्षीय पुरुष, कवठे धांदरफळ येथील 55 वर्षीय पुरुष, कनोली येथील 50 वर्षीय पुरुष, जाखुरी येथील 36 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध पुरुष व 38 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.


तसेच, शिवाजीनगर परिसरातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कवठे कमळेश्वर येथील 24 वर्षीय तरुण, आभाळवाडी येथील 29 वर्षीय तरुण, बोटा येथील 65, 36, 34 व 31 वर्षीय पुरुषांसह 27, 24 व 16 वर्षीय तरुणी, चंदनापुरीतील 40, 36, 25, 26 व 24 वर्षीय महिलांसह 32 वर्षीय तरुण, 13 व सात वर्षीय बालक व तीन वर्षीय बालिका, शिबलापुर येथील 42 वर्षीय व वीस वर्षीय तरुण, पानोडी येथील 27 वर्षीय तरुण, सोनेवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, शहराच्या लगत असलेल्या गुंजाळवाडी शिवारातील केशवनगर परिसरातील 27 वर्षीय महिलेसह पाच वर्षीय बालकालाही संक्रमण झाल्याचे समोर आल्याने शुक्रवारी रात्री तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची बाधित संख्या 1 हजार 595 वर जाऊन पोहोचली होती. आता त्यात पुन्हा 47 रुग्णांची भर पडली आहे.


जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील पंधरा जणांसह तालुक्यातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील उपासनी गल्ली परिसरातील 51 वर्षीय पुरुष व 41 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय तरुण व पाच वर्षीय बालक, गणेशनगर परिसरातील 40 वर्षीय तरुण, पावबाकी रोड भागातील 70, 46, 45 व 25 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 59 वर्षीय इसमासह 57, 30 व 28 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 24 वर्षीय तरुण, 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


तर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील रहाणेमळ्यातील 38 वर्षीय तरुण, शिरसगाव धुपे येथील 27 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 70 वर्षीय महिला, खांडगाव येथील 55 वर्षीय इसम व 50 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 55, 37 व 29 वर्षीय पुरुषांसह 40, 36, 26, 25, 20, 18 व 15 वर्षीय महिला व सात वर्षीय बालक, घुलेवाडी येथील 46 व 29 वर्षीय तरुणांसह नऊ वर्षांचे दोन, सात वर्षे व तीन वर्ष वयाच्या बालकांसह 29, 26, 20, 18 व 13 वर्षीरू महिला व दोन वर्षीय बालिका, खराडी येथील 26 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर शहरासह तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही मोठी भर पडल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येने सोळावे शतक पार करुन 1 हजार 642 संख्या गाठली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज 546 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 757 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 80 टक्क्यांहुन अधिक असून ते आता 83.15 टक्के इतके झाले आहे. काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्येत 200 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांमध्येही भर पडून ती आता 3 हजार 118 इतकी झाली आहे.


आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 73, संगमनेर 47, पाथर्डी 10, नगर तालुका 21, श्रीगोंदा 01, पारनेर 11, राहुरी 07, शेवगाव 27, जामखेड 01 येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 3 हजार 118 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 1 हजार 137, संगमनेर 211, राहाता 194, पाथर्डी 106, नगर तालुका 175, श्रीरामपूर 142, अहमदनगरचे लष्करी क्षेत्र 57, नेवासा 94, श्रीगोंदा 147, पारनेर 87, अकोले 150, राहुरी 97, शेवगाव 84, कोपरगाव 209, जामखेड 129, कर्जत 75, लष्करी रुग्णालय 21 आणि अन्य जिल्ह्यातील 03 रुग्णांचा समावेश आहे.

आज 546 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 219, संगमनेर 09, राहाता 30, पाथर्डी 25, नगर ग्रा. 44, श्रीरामपूर 20, कॅन्टोन्मेंट 12, नेवासा 22, श्रीगोंदा 15, पारनेर 25, अकोले 08, राहुरी 40, शेवगाव 13, कोपरगाव 30, जामखेड 21, कर्जत 08, मिलिटरी हॉस्पीटल 03 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत, एकूण 16757 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा 6956, संगमनेर 1356, राहाता 773, पाथर्डी 832, नगर ग्रा. 1056, श्रीरामपूर 671, कॅन्टोन्मेंट 467, नेवासा 598, श्रीगोंदा 632, पारनेर 673, अकोले 345, राहुरी 331, शेवगाव 480, कोपरगाव 627, जामखेड 393, कर्जत 473, मिलिटरी हॉस्पीटल 73, इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या : 16 हजार 757
    जिल्ह्यात उपचार सुरु असलेले एकुण रूग्ण : 3 हजार 118
    जिल्ह्यातील आजवारचे कोविड मृत्यू : 278
    जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या : 20 हजार 153
  • आज 546 रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
    आतापर्यंत जिल्ह्यात 16 हजार 757 रुग्ण बरे होऊन घरी परतले
    रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 83.15 टक्के
    आज नव्या 200 बाधितांची रुग्णसंख्येत भर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *