आंबीखालसा येथील सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी लांबवला किराणा घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली घटना; नागरिकांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ‘माय मार्ट सुपर शॉपी’ अज्ञात चोरट्यांनी फोडून किराणा मालासह कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी साहित्य चोरून पोबारा केला आहे. सदर घटना गुरुवारी (ता.3) पहाटेच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आंबीखालसा येथील किरण राजेंद्र भोर यांच्या मालकीची महामार्गालगत माय मार्ट सुपर शॉपी आहे. बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते आपली सुपर शॉपी बंद करून घरी गेले होते. दरम्यान, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि आतमधून तेलाचे डबे, मसाले, कोलगेट, बल्ब, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर आदी साहित्य चोरून पोबारा केला. शॉपीचे मालक भोर हे सकाळी शॉपी उघडण्यासाठी आले असता त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सदर घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी तोबा गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच ही चोरी झाली आहे. यापूर्वी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये चोर्‍या झाल्या आहेत, मात्र अद्यापही त्या चोर्‍यांचा शोध घारगाव पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजाविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Visits: 198 Today: 1 Total: 1867091

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *