अकोले तालुक्यात मंगळवारी 41 बाधित सापडले
अकोले तालुक्यात मंगळवारी 41 बाधित सापडले
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात मंगळवारी (ता.25) विक्रमी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी हे कोरोना हॉटस्पॉट ठरत तालुक्यात तब्बल 41 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहेत. यामुळे एकूण बाधितांची संख्या 449 झाली असून पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये धुमाळवाडी 12, ब्राम्हणवाडा 12, रेडे 9, आंभोळ 1, नवलेवाडी 1, देवठाण 1, खानापूर 1, शहरातील महालक्ष्मी कॉलनी 1, हनुमान मंदिरजवळ 1, जामगाव 1, कोतूळ 1 अशा एकूण 41 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खानापूर कोविड सेंटर, धुमाळवाडी येथे घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये धुमाळवाडी येथील 26 व ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या 50 रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 12 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामध्ये ब्राम्हणवाडा येथील 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. अकोले तालुक्यात मंगळवारी दिवसभरात आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजेच तब्बल 41 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 449 झाली आहे. यापैकी 316 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर 10 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 123 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.