संगमनेर दूध उत्पादक सोसायटीकडून 84 लाख बँकेत वर्ग ः कुटे
संगमनेर दूध उत्पादक सोसायटीकडून 84 लाख बँकेत वर्ग ः कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीच्यावतीने दिवाळीच्या निमित्ताने दूध उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर 83 लाख 86 हजार 737 रुपये वर्ग केले असल्याची माहिती माहिती संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब कुटे यांनी दिली.

संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीच्यावतीने प्रति दिवसाला पाच हजार लिटर दूध संकलन होत असते. खासगीकरणाच्या युगात आजही सहकारी तत्वावर चालणारी ही दूध संस्था महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पदवीधरचे आमदार डॉ.सुधीर तांबे, महानंदचे अध्यक्ष आणि संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे, संस्थेचे तज्ज्ञ संचालक आणि जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दूध संस्था प्रगतीपथावर आहे. दिवाळी निमित्ताने दूध उत्पादक सभासद अनामत 2 रुपयांप्रमाणे 33 लाख 42 हजार 234, तसेच दूध दर फरक दोन रुपये 51 पैशांप्रमाणे 41 लाख 94 हजार 503 रुपये असे एकूण 4 रुपये 51 पैसे प्रमाण 75 लाख 36 हजार 737 रुपये, भागांवरील लाभांश 3 लाख 50 हजार, पशुखाद्य रिबेट 1 लाख 50, कर्मचार्यांचा बोनस 3 लाख 50 हजार असे एकूण 83 लाख 86 हजार 737 रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ संचालक लक्ष्मण कुटे, संस्थापक भाऊसाहेब कुटे, संस्थेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे, उपाध्यक्ष विलास मेहेर, व्यवस्थापक जालिंदर पानसरे व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सवलतीच्या दरात तेल वाटपही करण्यात आले आहे.
![]()
