अनैतिक संबंधातून राहात्यात महिलेची आत्महत्या

अनैतिक संबंधातून राहात्यात महिलेची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, राहाता
अनैतिक संबंधाबाबत आम्ही तुझी समाजात बदनामी करू अशी धमकी देऊन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मयत विवाहितेच्या पतीने राहाता पोलिसांत फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी पत्नी कामास असलेल्या ठिकाणच्या मालकाने व त्याच्याबरोबर काम करणार्‍या एका व्यक्तीने असे मिळून दोघांनी मला फसवले आहे. मला सांगायला पण बरे वाटत नाही असे मला त्यावेळी पत्नीने सांगितले होते. त्यानंतर माझ्या कुटुंबातील एका नातेवाईक महिलेने माझ्या पत्नीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता पत्नीने झालेल्या फसवणुकीबद्दल माहिती दिली होती. आरोपी विकी शंकर बाबर व संजय गणपत सदाफळ यांनी अनैतिक संबंध करून फसवणूक केल्याने माझ्या पत्नीच्या मनात नेहमी मला जगायचे नाही, माझी फसवणूक झाली असे विचार येत होते. माझ्या पत्नीस आरोपी बाबर व सदाफळ यांनी दिलेल्या त्रासामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माझी खात्री झाली असून माझी त्यांच्याविरुद्ध फिर्याद आहे. दोन्ही आरोपींनी धमकी देऊन तिच्याशी अनैतिक संबंध केल्याने तिची समाजात बदनामी होईल म्हणून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यावरून आरोपी बाबर व सदाफळ यांचे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 674/2020 भादंवि कलम 306, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

 

Visits: 152 Today: 1 Total: 1880503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *