शिवसेनेचे आणखी एक मंत्री कोरोनाबाधित..

नायक वृत्तसेवा, नेवासा
मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच कुटुंबातील चार सदस्यांनाही लागण झाली आहे. यात ज्येष्ठे नेते यशवंतराव गडाख यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 19 मार्च रोजी मंत्री गडाख यांनी लस घेतली होती.

दरम्यान, गडाख कुटुंब बाधित झाली असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून मिळाली आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मी गृह विलगीकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेवून तातडीने तपासणी करुन घ्यावी. सर्वांना माझी विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी करावी. मास्क वापरा, नियमित हास्त स्वच्छ धुवा, विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहनही मंत्री गडाख यांनी समाज माध्यमांद्वारे केले आहे.

Visits: 187 Today: 2 Total: 1106145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *