ठेवीदारांचा विश्वास जपणे पतसंस्थांचे सर्वोच्च कर्तव्य : राजेश मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ठेवीदारांचा विश्वास जपणे हे पतसंस्थांचे सर्वोच्च कर्तव्य आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पतसंस्था अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रशिक्षणातून पतसंस्थांचा कारभार अधिक दर्जेदार होईल आणि उज्वल भविष्याकडे वाटचाल होईल  असे प्रतिपादन सहकारी बँकिंग मधील जेष्ठ अभ्यासक आणि मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन तथा संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रमुख मार्गदर्शक उद्योगपती राजेश मालपाणी यांनी  केले. 
राज्यस्तरीय शिखर प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अर्थात एमसीडीसी व  अहिल्यानगर जिल्हा सहकार उपनिबंधक यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, सेवक सहकारी पतसंस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षण समन्वयक मयूर शेळके, पवन पाटील यांचे सह एम सी डी सी चे राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे, संगमनेरचे सहकारी संस्था उपनिबंधक  संतोष कोरे, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अकोले अमोल वाघमारे, संगणक तज्ञ सहाय्यक प्रा.सिताराम कवडे, पुणे येथील लेखापरीक्षण सहनिबंधक तानाजी कवडे, मुंबई येथील सेवानिवृत्त सहनिबंधक लेखापरीक्षक आर.सी. शहा, अहिल्यानगर येथील तज्ञ व्याख्याते डॉ. प्रशांत खोपटिकर, अहिल्यानगरचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहकार क्षेत्रातील तीन दशकांचा सखोल अभ्यास आणि मालपाणी उद्योग समूह तथा संगमनेर मर्चंट बँकेला समर्थ नेतृत्व देऊन उत्तुंग प्रगतीचे शिखर गाठणारे दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व म्हणून मालपाणी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मालपाणी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये सहकारी पतसंस्थांच्या चळवळीचा सर्वांकष आढावा घेतला.
सामान्यांची आर्थिक गरज भागवण्याची सर्वात प्रभावी चळवळ म्हणजे पतसंस्था असे ते म्हणाले. ‘सावकारांच्या जाचातुन सामान्य लोकांची मुक्तता या चळवळीने केली आहे. मालपाणी उद्योग समूहाच्या स्टाफची आणि  कामगारांची वेगवेगळी पतसंस्था आहे आणि ४० वर्षांपासून अतिशय सुरळीत सुरू असून प्रगतीपथावर आहेत. या संस्थांनी उद्योग समूहातील कामगार, स्टाफ सहकारी, बंधू-भगिनी यांच्या गरजा पूर्ण करून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांची मुले-मुली  उच्चशिक्षित झाली आहेत. 
Visits: 100 Today: 4 Total: 1112829

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *