स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करा; शिवसेनेच्या उबाठा गटाची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाने जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात शिवसेना (उबाठा) गटाने म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात वाढ रचना अंतिम स्वरूपात झालेली आहे व नगराध्यक्ष पदाच्या सोडत देखील झालेल्या आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले बरेच कर्मचारी हे स्थानिक असून आगामी निवडणूक लक्षात घेता तातडीने संबंधित पोलीस स्टेशन हद्दीपासून दुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांची बदली करणे क्रम प्राप्त आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर असणारा कर्मचारी हा स्थानिक असून स्थानिक राजकारणाच्या विविध माध्यमातून शिफारतीने अप्रत्यक्षरतीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक लाभासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन ढवळाढवळ करून आपापसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा स्वरूपाचा वादग्रस्त कर्मचारी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या संगमनेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत असणे अयोग्य व नियमबाह्य आहे. संबंधित नमूद केलेल्या कॉन्स्टेबलकडून मोठ्या प्रमाणावर आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्थानिक व्यापारी वर्गाला हेतू पुरस्कृतरित्या त्रास होऊन त्यांच्याकडून अवैधरित्या आर्थिक लाभ मिळवला जातो. त्या संबंधात शिवसेनेकडे व्यापारी व व्यावसायिक लोकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याने संगमनेर मध्ये असणाऱ्या विविध अवैध व्यवसायिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक संबंध जोपासले आहे. अत्यंत विवादास्पद अशी कारकीर्द म्हणून त्याची ओळख आहे. संबंधित कर्मचाऱ्याचा भाऊ देखील नगर येथील विशिष्ट पथकात असल्याने दोघे संगणमताने अवैध व्यवसायिकांशी हात मिळवणी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ प्राप्त करून घेतात. त्यामुळे सदर स्थानिक कर्मचाऱ्याला तातडीने होमटाऊन मधून इतरत्र वर्ग करावे, जेणेकरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निष्पक्षरीत्या कुठल्याही अनुचित प्रकार न होता सुरळीत व शांततेत पार पडतील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी इम्तियाज शेख, फैसल सय्यद, अमित चव्हाण, विजय सातपुते, भाऊसाहेब वराळे, अमित फटांगरे, रंगनाथ फटांगरे, योगेश खेमनर, अक्षय गुंजाळ, लखन सोन्नर, सागर भागवत, संभव लोढा, वैभव अभंग, एकनाथ खेमनर, प्रकाश गायकवाड, रवि गिरी, बाळासाहेब कवडे, सदाशिव हासे, गोकुळ लांडगे, वैभव लांडगे, बाबा शिंदे, फरोज कतारी, प्रशांत खजुरे, त्रिलोक कतारी, शितल हासे, राजश्री राहणे, वैशाली वडतले, राजश्री वाकचौरे, संगीता गायकवाड, आशा केदारी, अजीज मोमीन, सचिन साळवे, दीपक साळुंखे, आसिफ तांबोळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Visits: 43 Today: 3 Total: 1109341
