पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने आज ‘कुंकुमार्चन सोहळा’

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज शुक्रवार दि.२६ सप्टेंबर रोजी शहरातील
मालपाणी लॉन्समध्ये पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पर्वणीचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकारद्वारे करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून संगमनेर मध्ये होणारा कुंकुमार्चन सोहळा महिला वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. भक्ती शक्तीचे प्रतिक असलेल्या करवीर निवासिनी माता महालक्ष्मी देवी, जगदंबा, दुर्गा, कालिका, शारदा, सरस्वती, रेणुका, सप्तशृंगी अशा अष्ट देवींच्या कृपेचे प्रासादिक कुंकू या सोहळ्यात लाभत असल्याने ही महिलांसाठी मोठी पर्वणी असते. श्रीशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुरोहित प्रतिष्ठान (संगमनेर पुरोहित संघ) प्रतीवर्षी कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करीत असतो. यंदा या उपक्रमाचे १२ वे वर्ष आहे. हा सोहळा आज शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मालपाणी लॉन्स सभागृहात संपन्न होणार आहे. सर्व महिलांना विनामुल्य सहभाग घेता येणार आहे. महिलांनी श्री अन्नपूर्णा देवी मूर्ती व श्रीयंत्र घेऊन पूजनास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी ब्रह्मवृंदाच्या मार्गदर्शनाखाली वेदमंत्रांचा घोष आणि श्रीसूक्त पठण केले जाणार आहे. माता भगिनींसाठी फराळ, चहा पान अल्पोपहार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. संगमनेर मधील सर्व माता भगिनींनी या सोहळ्याचा अवश्य लाभघ्यावा असे आवाहन निमंत्रक पुरोहित प्रतिष्ठान (संगमनेर पुरोहित संघ) चे अध्यक्ष अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, सचिव अरुण कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य विशाल जाखडी, रवी तिवारी, प्रतीक जोशी, रवींद्र बल्लाळ आदींनी केले आहे. तुळजापूर येथील मेघना व सुजित नाईक सराफ यांनी सर्व माता भगिनींना तुळजापूर येथील खास कुंकू पुरोहित प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली आहे.

Visits: 37 Today: 3 Total: 1114527
