यंदा कोरोनानी बैलपोळ्यावर फिरले पाणी…
यंदा कोरोनानी बैलपोळ्यावर फिरले पाणी…
नायक वृत्तसेवा, अकोले
यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने सर्वच सण-उत्सवांवर पाणी फिरले आहे. त्यात निसर्गाची अवकृपा आणि बाजारभाव नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. बळीराजाचे साथीदार असणार्या सर्जा-राजाच्या बैलपोळा सणावरही अकोले तालुक्यात कोरोनाचे सावट असल्याचे दिसून आले. यामुळे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करणार्या बैलपोळा सणावर कोरोना विषाणूंनी विरजण पाडले.
एरव्ही बैलपोळा म्हंटल की, बळीराजाची आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध रंग, झूल, बाशिंग, घुंगरमाळा, फुगे आदी साहित्यांची खेरदी करण्यासाठी लगबग असते. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे उत्साहावर अक्षरशः पाणी फिरले. त्यात वरुणराजाची अवकृपा आणि शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. तरीही आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकर्यांनी आपापल्या परीने खर्च करुन सण साजरा केला. मात्र, दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करणार्या बैलपोळा सणावर मात्र कोरोना विषाणूंनी पाणी फिरल्याचेच म्हणावे लागेल.