व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगतर्फे ‘खाकी दुर्गांचा’ सन्मान

नायक वृत्तसेवा, नाशिक 
पोलिस आयुक्तालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे  मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सेवाभावाला अभिवादन करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग तर्फे नवरात्री निमित्त ‘खाकी दुर्गांचा’  विशेष सन्मान करण्यात आला.
पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनिया इनामके, क्षितिजा ठुबे, पो. कॉ. ज्योती निघूते, पो. कॉ. कोमल पवार,ज्योती खरे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पोलिस नियोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मनीषा कांबळे आदी ‘खाकी दुर्गांना’  प्रतिनिधीक स्वरूपात  शाल व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. समाज सुरक्षेच्या आघाडीवर कार्यरत या ‘खाकी दुर्गा’ना सन्मानित करून  त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.
 महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रश्मी मारवाडी, राज्य संघटक पल्लवी शेटे, व्ही.ओ.एम महाराष्ट्र मिशनच्या पदाधिकारी गायत्री लचके, नाशिक जिल्हा अध्यक्ष रेणुका गायकवाड आदी  पदाधिकारी तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य  उपस्थित होते. कुटुंब, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्यांचा समतोल साधत महिला पोलीस ज्या धैर्याने व समर्पणाने काम करतात, त्या प्रत्येकजणी समाजासाठी प्रेरणादायी आहेत, या भावना या सत्कारामागे आहेत.
सन्मान स्वीकारताना ‘खाकी दुर्गांनी’ व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगचे आभार मानले व समाजाच्या सुरक्षेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे पोलिस व समाजातील बंध अधिक दृढ होऊन परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्हॉईस ऑफ मीडियाने  व्यक्त केला.
Visits: 121 Today: 1 Total: 2168464

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *