भरपूर पाऊस पडू दे बळीराजा सुखी होऊ दे : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
तालुक्यात भरपूर पाऊस पडु दे,बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे, आणि  तालुका सुजलाम होऊ दे असे साकडे आमदार अमोल खताळ यांनी खांडगाव येथील खांडेश्वर आणि धांदरफळ येथील रामेश्वर व नागेश्वर चरणी घातले.
 
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार निमित्त  तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर, धांदरफळ येथील रामेश्वर आणि नागेश्वर या महादेवाच्या मंदिरात आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक  महाअभिषेक करत दर्शन घेऊन महाआरती केली आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, खांडेश्वर, बाळेश्वर, निझरणेश्वर आणि रामेश्वर या चारही महादेव मंदिरांमध्ये प्रत्येक वर्षी भेट देऊन देवदर्शन करत आशीर्वाद घेत आलेलो आहे मात्र यावर्षी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच महादेवांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आहे.
या विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि या तालुक्याचा गेली ४० वर्षापासून रखडलेला सर्वांगीण विकास करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आ.अमोल खताळ यांनी  महादेव चरणी केली. यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे सचिव अशोक गुंजाळ यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला.
धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कामाची प्रशंसा करत खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचेही काम चांगले चालू असल्याचे कौतुक त्यांनी  केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बादशाह गुंजाळ, ठकाजी गुंजाळ,  शामराव गुंजाळ, माजी सरपंच भारत गुंजाळ, विकास आरगडे, योगेश गुंजाळ,  सागर गुंजाळ, रामदास गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, गोकुळ सातपुते, रोहिदास गुंजाळ, बाजीराव रुपवते, संतोष गुंजाळ, बाळासाहेब मोकळ, नसीर शेख यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Visits: 239 Today: 1 Total: 2124820

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *