दर्शन मेडीकल शॉपीचा दिमाखात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
किफायतशीर दरात औषधे विक्री करुन असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन करणार्या दर्शन मेडीकल शॉपीने दुसरी शाखा उघडली आहे. या शाखेचा मंगळवारी (ता.20) आषाढी एकादशीनिमित्ताने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते फीत कापून दिमाखात शुभारंभ झाला.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे असलेल्या दर्शन मेडीकल शॉपीने ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याच्या हेतूने कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील कासारवाडी येथे दुसरी शाखा उघडली आहे. या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्या सुनीता कानवडे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, कासारवाडीचे सरपंच राजेंद्र त्रिभुवन, भोलेनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष शिवाजी घुले आदी उपस्थित होते. गतिमान आणि माफक दरात सेवा घेण्यासाठी अधिकाधिक ग्राहकांनी शॉपीस भेट द्यावी, असे आवाहन दर्शन मेडीकल शॉपीचे संचालक अमोल गुंजाळ व प्रवीण गोपाळे यांनी केले आहे.
