महाराणाची ‘गणेशोत्सव’ कार्यकारिणी जाहीर! स्वाती अंकारम अध्यक्षपदी; आकर्षक देखाव्यांची अखंड परंपरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या महाराणा प्रताप महिला मित्र मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या धर्तीवर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वाधीक आकर्षक देखावा सादर करण्याचा पायंडा घालणार्‍या या मंडळाने एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा राज्यस्तरीय पुरस्कारही पटकावला होता.
मंडळाचा लौकीक कायम ठेवून यावर्षी देखील ही परंपरा अखंड ठेवण्याचा प्रयत्न करु असा निर्धार व्यक्त करीत नूतन अध्यक्ष स्वाती संतोष अंकारम यांच्यासह कार्याध्यक्ष वैशाली काशिनाथ आडेप, साईसुधा विलास वनम, सह कार्याध्यक्ष ललिता हिरालाल दुस्सा, लता किसन कोम्पेल्ली,उपाध्यक्ष आरती पवन पासकंटी व गीतांजली शैलेंद्र शेरे, सेक्रेटरी कल्याणी अजय गुरूड, सह सेक्रेटरी दिपाली सुधाकर आडेप, खजिनदार वैशाली अंबादास आडेप, सह खजिनदारपदी जयश्री अशोक आडेप, प्रकल्प प्रमुख संगीता संदीप अंकारम, अलका शंकर आडेप, गीता सिद्धेश्वर आडेप, सह प्रकल्प प्रमुखपदी भारती शंकर कोम्पेल्ली, दुर्गा लक्ष्मण दावनपल्ली, अपूर्वा सतीश आडेप, राणी अभिजीत क्यातम, प्रसिद्धी प्रमुख स्वामिनी कुंजल कांबळे, नम्रता संजय आडेप, वैष्णवी सतीश आडेप आणि त्यांच्या कार्यकारिणीने सर्वानुमते पदभार स्वीकारला.
 जवळपास सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेरातील सार्वजनिक गणेशोत्सवात अलिकडच्या काळात भव्य आणि आकर्षक देखावे उभारण्याची पद्धत रुजली आहे. चव्हाणपूरा भागात असलेले महाराणा प्रताप महिला मित्र  मंडळ त्यात काही औरच. अतिशय भव्य आणि देखणा धार्मिक, अगदी पुण्यातील दगडूशेठ, कसबा, अशा मोठ्या गणेश मंडळांच्या धर्तीवरच भव्य-दिव्य देखावा सादर करण्यासह गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तो पाहण्यासाठी खुला करण्याची नवीन पद्धतही संगमनेरात रुजवली आहे. या मंडळाच्या श्रींचे विसर्जन करताना निघणारी शोभायात्राही खूप आकर्षक असते. महिलांचा लक्षणीय सहभाग आणि त्यातही पुरुष आणि महिलांचे एकसारखे पोशाख यामुळे महाराणाची विसर्जन मिरवणूकही शहरात आकर्षणाचे केंद्र राहीली आहे.
अशा विविधतेने नटलेल्या या मंडळाच्या आगामी वर्षभरासाठीच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वाती संतोष अंकारम यांच्याकडे सोपवण्यात आली असून कार्याध्यक्ष वैशाली काशिनाथ आडेप, साईसुधा विलास वनम, सह कार्याध्यक्ष ललिता हिरालाल दुस्सा, लता किसन कोम्पेल्ली,उपाध्यक्ष आरती पवन पासकंटी व गीतांजली शैलेंद्र शेरे, सेक्रेटरी कल्याणी अजय गुरूड, सह सेक्रेटरी दिपाली सुधाकर आडेप, खजिनदार वैशाली अंबादास आडेप, सह खजिनदारपदी जयश्री अशोक आडेप, प्रकल्प प्रमुख संगीता संदीप अंकारम, अलका शंकर आडेप, गीता सिद्धेश्वर आडेप, सह प्रकल्प प्रमुखपदी भारती शंकर कोम्पेल्ली, दुर्गा लक्ष्मण दावनपल्ली, अपूर्वा सतीश आडेप, राणी अभिजीत क्यातम, प्रसिद्धी प्रमुख स्वामिनी कुंजल कांबळे, नम्रता संजय आडेप, वैष्णवी सतीश आडेप यांची एकमताने निवड करण्यात आली.
Visits: 134 Today: 2 Total: 1113680

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *