चणेगाव येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, झरेकाठी
संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे मालदाडच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे आगमन झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ते गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक मार्गदर्शन करणार आहेत.

या कृषिदूतांचे चणेगाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या गटाचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद हारदे असून या गटांमध्ये कृषिदूत विवेक रौंदळ,आदित्य राऊत, अभिषेक ढोले, रोशन ढोमसे, ओम शेजुळ हे विद्यार्थी आहेत. हे कृषिदूत शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती, सुधारित शेती पद्धती, पिकाचे नियोजन, खत व्यवस्थापन, जैविक शेती, सिंचन पद्धती आणि विविध सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य करणार आहे. या कृषिदूतांचे चणेगाव येथे ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच भाग्यश्री खेमनर, तलाठी श्रीमती गांगुर्डे, लिपिक गणेश पाटोळे आणि शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील शेतीत नक्कीच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Visits: 99 Today: 1 Total: 1098243
