स्वामी समर्थ महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेमुळे अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होईल : डॉ.बडे महाराज
नायक वृत्तसेवा, शेवगाव
राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकुलात श्री स्वामी महाराजांचा वास निवास सुरू झाला असून या आध्यात्मिक सेवेद्वारे या परिसरामध्ये अध्यात्मिक शैक्षणिक ऊर्जा प्राप्त होईल आणि याद्वारे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे ज्ञान प्रगत होईल असे मत गणेश बडे महाराज शास्त्री यांनी किर्तन रुपी सेवेतून व्यक्त केले.
केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित तालुक्यातील राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकुलात श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मंदिर सुरू करण्यात आले असून या अध्यात्मिक मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ध्वजारोहणाचा अध्यात्मिक कार्यक्रम तीन दिवस उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कीर्तन सेवेत बडे महाराज बोलत होते.

यावेळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण भिलवडे ता. पाथर्डी येथील दुर्गाशक्ती गडाचे मठाधिपती डॉ.गणेश महाराज बडे शास्त्री यांच्या शुभ हस्ते विधिवत मंत्रोच्चारात पार पडले.सकाळी आठ ते दहा होम हवन ढाकणे परिवाराच्या उपस्थितीत संपन्न होऊन कलशारोहण टाळ मृदंगाच्या गजरामध्ये संपन्न झाला.त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा बडे महाराज शास्त्री आणि बटुळे महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

अतिशय देखणी सुंदर स्वामी मूर्ती स्वामी समर्थ मंदिरामध्ये प्रकट झाली अशा प्रकारची भावना सर्व सेवेकऱ्यांमध्ये दिसून आली.या मंदिर निर्मितीमध्ये आणि तीन दिवसीय आध्यात्मिक सेवेचे पौराहीत्य प्रमोद जोशी आणि संगमनेरचे सहकारी यांनी केले.या मंदिर निर्मितीमध्ये आणि परिसरासाठी ज्या मान्यवरांनी योगदान, सहकार्य केले.यांचा डॉ. एकनाथ ढाकणे,श्रीकांत ढाकणे,ऋषिकेश ढाकणे,जया ढाकणे,अमृता ढाकणे,हर्षा ढाकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ कथाकार विकास महाराज हापसे, स्वाती महाराज हापसे,डॉ. शुभांगी बडे,डॉ. सोमनाथ रामदास बडे, नामदेव सानप बोरिवली,आर्किटेक्चर अभिषेक बडे,ऋषिकेश बडे,अफसर शेख सरपंच राक्षी,विश्वनाथ फुंदे, विश्वनाथ कातकडे,संतोष खंडागळे,डॉ.तुकाराम सांगळे, मल्हारी खेडकर, रामदास बडे, बबन बडे, विश्वनाथ फुंदे, महेश फुंदे, काशिनाथ चेमटे, अंकुश गाडे, ऋषिकेश थोरात, आहेर आदींसह विद्यार्थी, पालक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदेव सानप यांच्या अन्नदानाद्वारे महाप्रसाद सर्व सेवेकऱ्यांना देण्यात आला.

मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून जगाचे चालक-मालक- पालक श्री स्वामी समर्थ महाराज असून त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेद्वारे या परिसरामध्ये असणारी निगेटिव्हिटी जाऊन ऊर्जा शक्ती प्राप्त होणार आहे.तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी व अध्यात्मिक सेवा आणि विज्ञान याची एकत्रित सांगड घातल्यास मनुष्य जीवन सार्थक होते.देश बलवान होतो.परिसर शक्तिशाली होतो असे मत ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एकनाथ ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Visits: 73 Today: 1 Total: 1587217
