सहाव्या फेरीत बाळासाहेब थोरात यांना काहीसा दिलासा! काही गावांनी सावरले; मतांच्या फरकातील तफावत घटली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोस्टलसह सलग चारफेऱ्यांमध्ये तब्बल सातहजार एकोणावीस मतांनी पिछाडीवर गेलेले दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पाचव्या फेरीअखेर काहीसा दिलासा मिळाला असून घुलेवाडीसह खांजापूर, कुरण पोखरी हवेली व करुले या गावांनी त्यांना सावरले आहे. पाचव्या फेरीअखेर थोरात यांनी 2 हजार अधिक मतं मिळवताना 7 हजार मतांचा आकडा पाच हजारांवर आणला. मात्र सहाव्या फेरीत कौठे कमळेश्वर, लोहारे, मिरपूर, शिवापूर, मेंढवन, कोकणगाव व कोंची-मांची या गावांनी अमोल खताळ यांच्या मताधिक्यात आणखी पाचशेची भर घातल्याने सहाव्या फेरीअखेर बाळासाहेब थोरात साडेपाच हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
Visits: 126 Today: 1 Total: 307935