इलेक्ट्रिक मोटार चोरणारे तिघे मोटारसायकलसह जेरबंद 44 हजारांचा मुद्देमाल जप्त; राजूर पोलिसांची दमदार कामगिरी


नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील राजूर येथील सोमनाथ विठ्ठल वालझाडे यांच्या शेतातील विहिरीवरुन दोन इलेक्ट्रिक मोटार चोरीला गेलेल्या होत्या. याबाबत दाखल गुन्ह्याचा राजूर पोलिसांनी तपास लावून तिघांना अटक करुन 44 हजार रुपयांचा जप्त केला आहे. या दमदार कामगिरीबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

शेतकरी सोमनाथ वालझाडे यांच्या शेतातील विहिरीवरुन दोन इलेक्ट्रीक मोटार चोरीला गेल्या प्रकरणी राजूर पोलिसांत गुरनं 180/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत समजले की, सदर इलेक्ट्रिक मोटारी भालचंद किसन भांगरे (रा.राजूर) याने चोरल्या आहेत. यावरुन त्यास चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेतले असता त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे कबुली दिली.

साथीदार प्रवीण लक्ष्मण शेळके व मिलिंद तान्हाजी म्हशाळ (दोघेही रा.भोजदरावाडी, ता.अकोले) यांना ताब्यात घेतले असता त्यांनीही सदर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक करुन त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल व इलेक्ट्रिक मोटार असा एकणू 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, उपनिरीक्षक जी. एफ. शेख, पो. ना रोहिणी वाडेकर, चा.पो.ना. तांबे, पो.कॉ. अशोक गाढे, विजय फटांगरे, सुनील ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूरचे पो.ना. सचिन धनाट, पो.कॉ.प्रमोद जाधव यांनी केली असून पुढील तपास म.पो.ना. रोहिणी वाडेकर हे करत आहेत.

Visits: 4 Today: 2 Total: 23133

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *