नवोपक्रमातून उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधनाची गरज ः सिंह नवोपक्रमशील शिक्षकांसह अधिकार्‍यांना बक्षिसांचे वितरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल, अधिक गुणवत्तापूर्ण व समृध्द होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी केले.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने राज्यातील विविध संवर्गातून निवडलेल्या गेलेल्या नवोपक्रमशील शिक्षक, अधिकारी यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ह. ना. जगताप, समन्वयक विभागाचे प्राचार्य विकास गरड, प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, संशोधन विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ. अमोल डोंबाळे उपस्थित होते.

पुढे बोलताना संचालक सिंह म्हणाले, नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या उन्नतीकरता शिक्षकांनी विविध नवोपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत. शिक्षक नवोपक्रमशील राहतील तर ते विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. विद्यार्थ्यांना देखील नव्या नव्या वाटा चालण्यासाठी त्यांच्यामध्ये शक्ती भरा असे आवाहन केले. ह. ना. जगताप यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद करीत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. अत्यंत पारदर्शी आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांनी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी संशोधनाच्या वाटा चालाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात पाच गटांत नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या पाच क्रमांक मिळविणार्‍या शिक्षक व अधिकारी यांना सन्मानचिन्ह, पुस्तक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात अध्यापकाचार्य व शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय अधिकारी गटात प्रथम क्रमांक योगेश सोनवणे (नाशिक डायट), द्वितीय क्रमांक ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. गंगाधर वाळले (परभणी डायट), दीपा सावंत, चतुर्थ क्रमांक शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर तर पाचवा क्रमांक शंकर यादव यांना मिळाला. विषय सहाय्यक व साधन व्यक्ती गटात प्रथम क्रमांक कविता घोडे, द्वितीय क्रमांक संदीप वाकचौरे (अहमदनगर), तृतीय क्रमांक अनिता इंगळे, चतुर्थ क्रमाक संगीता कामडी, पाचवा क्रमांक प्रमोद झिरपे (औरंगाबाद), माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक नम्रता पाटील, द्वितीय क्रमांक सुधीर बंडगर, तृतीय क्रमांक श्यामराव रावले, चौथा क्रमांक उषा कुलकर्णी, पाचवा क्रमांक उमेश इंगळे, प्राथमिक गटात प्रथम क्रमांक राजश्री निर्वाण, द्वितीय क्रमांक दीपक डवर, तृतीय क्रमांक सचिन देसाई, चौथा क्रमांक बाबू मोरे, पाचवा क्रमांक प्रशांत चीपकर, अंगणवाडी कार्यकर्ता, सेविका, पर्यवेक्षक गटात प्रथम क्रमांक कांचन उमराणी, द्वितीय क्रमांक अनुराधा देशपांडे, तृतीय क्रमांक अनुजा ग्रामोपाध्ये, चौथा क्रमांक ललिता आसटकर, पाचवा क्रमांक वैशाली डेळेकर यांनी पटकावले. प्रास्ताविक डॉ. अमोल डोंबाळे यांनी केले. डॉ. संजीवनी महाले, डॉ. गीतांजली बोरूडे, डॉ. इसावे आदिंसह परिषदेचे अधिकारी, उपविभागप्रमुख व राज्य भरातून आलेले शिक्षक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल शिनगारे यांनी तर आभार श्याम राऊत यांनी मानले.

Visits: 14 Today: 1 Total: 116991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *