आठव्या फेरीअखेर बाळासाहेब थोरात आठ हजार मतांनी पिछाडीवर! खताळ यांची थोरात यांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी; गुंजाळवाडी व राजापूरचा मोठा धक्का..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोस्टल मतदानापासून संगमनेर विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरु झालेली लढत अत्यंत रोमांचक परिस्थितीकडे जात असून मागील दोन फेऱ्यांमध्ये मतांचे अंतर कमी करण्यात यश मिळवणाऱ्या थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी सलग चाळीस वर्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या राजापूर आणि गुंजाळवाडी परिसराने यावेळी अमोल खताळ यांच्या बाजूने आपला कौल दिल्याने दोघांमधील मतांची तफावत आठव्या फेरीअखेर आठ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चिंतेतही मोठी भर पडली आहे. राज्यातील महायुतीची घोडदौड पाहता आणि बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसत असल्याने संगमनेर मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता आहे.

Visits: 113 Today: 2 Total: 424600