साई मंदिर परिसरात चप्पल बूट घालून प्रवेशावर बंदी! साईबाबा संस्थानच्या निर्णयामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण


नायक वृत्तसेवा, शिर्डी
सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्‍या साईंच्या नगरीमध्ये दररोज देश-विदेशातील हजारो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षारक्षक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चप्पल, बूट घालून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे साईभक्तांमध्ये आनंदचं वातावरण आहे.

साईबाबा संस्थानच्यावतीने साई मंदिर परिसरात चप्पल, बूट घालून प्रवेश करण्यावर बंदीचे नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले असून या नियमाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता.12) करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अनेक अधिकारी विना चप्पल, बुटाचे मंदिर परिसरात दिसून आले.

साईबाबा संस्थानचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, सर्व विभागांचे विभागप्रमुख, कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करताना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश द्वाराबाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश करावा. तसेच संरक्षण विभागाने साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना साईंच्या समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देताना पादत्राणे प्रत्येक प्रवेश द्वाराबाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश द्यावा. सदर परिपत्रकाची कार्यवाही शुक्रवारपासून तत्काळ करण्यात यावी असे, नमूद करण्यात आले आहे.

Visits: 184 Today: 1 Total: 2122949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *