आदर्शवत महिलांचे गुण पुन्हा आत्मसात करावे ः नळकांडे श्रीरामपूरमध्ये महिलांसाठी विनामूल्य दंड चालविण्याचे प्रशिक्षण


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
आपल्यातील लुप्त होत चाललेले धर्मसंस्कार, धर्माबाबतची वाढत चाललेली उदासीनता पुन्हा जागृत करण्यासाठी महिलांनी दीपिका पादुकोणचे नाहीतर माता ताराराणी, जिजाई, येसूबाई, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या आदर्शवत महिलांचे गुण पुन्हा आत्मसात करावे लागतील. त्यासाठी आजची महिला सावध झाली नाहीतर येणारा भविष्यकाळ तिच्यासाठी कठीण असणार आहे, अशी भीती दुर्गावाहिनीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजिका अमृता नळकांडे यांनी व्यक्त केली आहे.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी रणरागिणी शक्ती साधना केंद्र पश्चिम महाराष्ट्र प्रांत श्रीरामपूर प्रखंड यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित केलेल्या महिलांसाठी विनामूल्य दंड चालविणे (काठी), रायफल, नियोद्ध बाधा या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, लव्ह जिहाद समाजात खूप मोठ्या प्रमाणात फोफावला असून धर्म संस्कृती शिक्षणाच्या अभावामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ते थांबवण्यासाठी असे प्रशिक्षण गावागावात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील सर्वांनीच गट-तट विसरून पुढे येण्याची आज गरज आहे.

महेश व्यास यांनी देखील रामायण व महाभारतातील काही प्रसंग सांगून महिलांना मार्गदर्शन केले. दर रविवारी श्रीरामपूरात असे प्रशिक्षण वर्ग दुपारी 3 ते 5 यावेळेत भरविण्यात येणार आहेत. ज्या मुलींना व महिलांना या विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रोड, टेकावडे बिल्डिंग समोर विहिंप तालुकाध्यक्ष अमित मुथा यांच्याकडे नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले तर प्रभातचे किशोर निर्मळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग, सागर बेग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शक्ती साधना केंद्राच्या प्रांत संयोजिका अ‍ॅड. पल्लवी कांबळे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, जिल्हा मंत्री श्रीकांत नळकांडे, विशाल वाकचौरे, श्रीरामपूर प्रखंड मंत्री अनिल थोरात, शहर मंत्री प्रदीप जाधव, दुर्गावाहिनी संयोजिका सपना थेटे, सहसंयोजिका जयश्री थोरात, मातृशक्ती विद्या वाघ, योगेश ओझा, भाऊसाहेब थेटे आदिंनी विशेष प्रयत्न केले.

Visits: 154 Today: 2 Total: 1579765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *