राज्यात गणेश मूर्ती बनविण्यात संगमनेरचे नाव उज्ज्वल होईल ः आ. डॉ. तांबे गणेश मूर्ती बनविणार्या लिबर्टी अर्थवेअर आर्ट दालनाचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सव जगभरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. आकर्षक गणेश मूर्तींची पेण, नगर पाठोपाठ आता संगमनेरातही पर्यावरणपूरक निर्मिती होत आहे. शिवाय कोरोनाच्या काळात छोटे-मोठे उद्योगधंदे अडचणीत आले. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्ट या महिलांच्या संस्थेने शाडू व लाल मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. म्हणून भविष्यात महाराष्ट्रात मातीच्या मूर्ती बनविण्याचे संगमनेरचे नाव उज्ज्वल होईल, असा आशावाद नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.
संगमनेर येथील लिबर्टी अर्थवेअर आर्ट या शाडू व लाल मातीच्या श्री गणेश मूर्तींच्या दालनाचा उद्घाटन समारंभ नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचे हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर महिला गृह उद्योगचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, बौद्ध धर्मप्रसारक राहुल भंते, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, संगमनेर औद्योगिक वसाहत वसाहतीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस निर्मला गुंजाळ, नगरसेवक नितीन अभंग, गजेंद्र अभंग, राजेंद्र वाकचौरे उपस्थित होते.
पीओपीच्या गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण होते. गणेशोत्सवात ध्वनि प्रदूषण व इतर प्रदूषण होते. प्रदूषणाचे महत्त्व कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावा लागला तेव्हा लोकांना समजलं. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करा. संगमनेर तालुक्यात निर्मित होणार्या शाडू व लाल मातीच्या गणेश मूर्ती तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने विकत घ्या व त्याची स्थापना करा असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. याप्रसंगी सुरेश कोते, राहुल भंते, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, गोरक्ष मदने यांची भाषणे झाली. संस्थेच्या संचालिका अलका हासे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक महाव्यवस्थापक भानुदास उपाध्ये, सूत्रसंचालन सदाशिव मुळे यांनी केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे कैलास वाकचौरे, राष्ट्र सेवा दल महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजाभाऊ अवसक, कारखान्याचे संचालक विनोद हासे, सागर हासे, पोपट महाराज आगलावे, संस्थेच्या संचालिका वंदना जोर्वेकर, छाया उपाध्ये, उत्पादन प्रमुख हेमंत जोर्वेकर, व्यवस्थापक राजेंद्र हासे, योगेश शिंदे, शुभम जोर्वेकर, आशा वाकचौरे, सौदामिनी कान्होरे, कांदळकर ताई, डॉ. हनुमंत मोटेगावकर, ज्ञानेश्वर वाकचौरे, संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, अशोक वामन, दिलीप हासे, अण्णा हासे, रवींद्र मंडलिक, प्रभाकर भागवत, ज्ञानेश्वर वाकचौरे आदी उपस्थित होते.