मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ओबीसी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला ः भांगरे अकोलेत भाजपने मोर्चा काढून नोंदवला राज्य सरकारचा तीव्र निषेध

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही असे आश्वासन देणार्‍या मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.

अकोले भाजप कार्यालयापासून सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे महसूल नायब तहसीलदार पाचर्णे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, नगरपंचायत सदस्य बाळासाहेब वडजे, युवा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, नगरसेवक परशराम शेळके, सचिन शेटे, शिवाजी पारासूर, अमोल येवले, ज्ञानेश्वर पुंडे, शिवाजी उंबरे, किशोर काळे, विलास भरीतकर, मच्छिंद्र चौधरी, शुभम खर्डे, मनोज वावळे, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, सागर पथवे, दादाभाऊ मंडलिक, नवनाथ मंडलिक, शांताराम बनकर, मुकेश पवार, भाऊसाहेब वाकचौरे, रामदास पांडे, दत्ता ताजणे, रवींद्र जगदाळे, सुदाम मंडलिक, नवनाथ पन्हाळे, नंदू गायकवाड, दत्तात्रय मंडलिक, दत्तात्रय सगर, संदीप गुजर, पराग कोळपकर, गोपीनाथ चौधरी, सचिन मैड, राम रुद्रे आदिंच्या सह्या आहेत.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारला ओबीसी आरक्षण टिकविण्यात अपयश आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यास वकीलच हजर राहिला नाही. तसेच भाजप नेतृत्वाने ओबीसी समाजाचा इम्पिरिअल डाटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असा आदेश काढूनही सरकारने गत सहा महिन्यांत काहीच कार्यवाही केली नाही. तसेच त्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधीही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील वजनदार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण न देताच निवडणुका हव्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे युक्तीवाद केला नसल्याचा आरोप दस्तुरखुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यास आता विधी व न्याय खाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारचे पालक शरद पवार यांनी या बाबीचा खुलासा करावा असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *