महालक्ष्मी हिवरे येथील स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण पॉज मशिनची तोडफोड; सोनई पोलिसांत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास माल न दिल्याच्या कारणातून स्वस्त धान्य वाटपाचे ई-पॉज मशिन फोडून मारहाण केली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 x 10 cm.cdr

महालक्ष्मी हिवरे येथे रामनाथ लक्ष्मण बोरूडे (वय 49) यांचे शासनमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.17) बोरूडे हे दुकानात माल वाटण्यासाठी गेले होते. यावेळी रवींद्र भीमराज चौधरी हा कार्डधारक आला व त्याने धान्याची मागणी केली असता, वीज गेली असल्याने ई-पॉज मशिन बंद असून त्यामुळे धान्य देता येणार नाही, असे बोरुडे म्हणाले. याचा राग आल्याने रवींद्र चौधरी याने ई-पॉज मशिनची तोडफोड करून रामनाथ बोरूडे यांना मारहाण केली. यावेळी बोरूडे यांचा पुतण्या वैभव अंकुश बोरूडे व मुलगा साईनाथ तसेच भावजय उषा यांनाही दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. भांडणानंतर जाताना रवींद्रने मला धान्य न दिल्यास तुला जीवे ठार मारील असा दम दिला.

याप्रकरणी रामनाथ बोरूडे यांनी सोनई पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रवींद्र चौधरी याच्याविरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 427 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राख हे करत आहेत. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर स्वस्त धान्य दुकानदार संघटना ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा मीना कळकुंभे, तालुकाध्यक्ष सुधाकर निकम यांनी सदर ठिकाणी भेट देऊन झालेल्या घटनेचा निषेध केला असून आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी पिनू पाखरे, सचिन कडू, मच्छिंद्र पवार, सुरेश लोखंडे, ईश्वर मते उपस्थित होते. या घटनेचा तालुकाध्यक्ष माणिक जाधव, ए. पी. झिरंगे, शिवाजी सैद, एन. एस. गंगवाल, प्रसिद्धीप्रमुख मंगेश छतवाणी, नरेंद्र खरात, सी. बी. गायकवाड, नवीन वधवाणी, वासुदेव वधवाणी, राहुल पगारे, प्रशांत भागवत, संतोष वेताळ, गणेश चव्हाण, अरुण खंडागळे, विनायक काळे, दिलीप त्रिभुवन, विक्रम क्षीरसागर, गणेश चव्हाण, अप्पासाहेब शिंदे, आर. एम. शिंदे, आर. जी. काळे, जे. एन. रणनवरे, बी. आर. म्हस्के, सोमनाथ देवकर आदिंनी निषेध केला आहे.

Visits: 159 Today: 1 Total: 1774832

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *