लव्ह जिहादबाबत मराठा समाजाने जागरूक राहावे ः कोंढरे संगमनेरात अहमदनगर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लव्ह जिहादचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला असून मराठा समाजातील मुली त्याचे बळी ठरत आहे. समाजाने यासाठी जागरूक राहिले पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे.

संगमनेर विश्रामगृह येथे आयोजित अहमदनगर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी तालुकाध्यक्ष, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, राहाता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, अजय हासे, साहेबराव दातखिळे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळतून युवकांना कर्ज मिळवून देण्याबरोबर व्यवसायिक मार्गदर्शन केले पाहिजे. सारथीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्यातून मराठा सनदी अधिकारी निर्माण झाले तर समाजासाठी मोठे कार्य होईल. या दोन्ही योजना आरक्षणामुळे होणार्‍या फायद्यासारखे आहेत असे राजेंद्र कोंढरे म्हणाले. तसेच मराठा समाजाला आता सुधारण्याची गरज असून साध्या पद्धतीने लग्न करावे. मानपानाच्या नादी न लागत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आपले मुलांचे लग्न ठरवित असताना त्याची पूर्ण खात्री करावी, खरंच तो नोकरीला आहे का? पगार खरा सांगितला आहे का? त्यांनी सांगितलेली स्थावर मालमत्ता त्यांचीच आहे का? या गोष्टी तपासले तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी राहुरी तालुकाध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष दिनकर पवार यांची निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठा महासंघाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यासाठी आणि कुटुंब अ‍ॅपमधून अडीच लाख नागरिकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल भाऊसाहेब वाकचौरे यांचे विशेष अभिनंदन राजेंद्र कोंढरे यांनी केले.

Visits: 9 Today: 1 Total: 115747

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *