मापारी हल्ला प्रकरणी मुख्य हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

मापारी हल्ला प्रकरणी मुख्य हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील पंधरा-वीस कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यातील मुख्य हल्लेखोर सुशील रघुनाथ शिंदे याला आज तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

काँग्रेसचे सरचिटणीस मापारी यांना मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील पंधरा-वीस कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. या गुंड प्रवृत्तीचा निषेध करत हल्लेखोरांना तातडीने अटक करा अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेस व राहाता तालुका काँग्रेस समितीच्यावतीने तालुका पोलिसांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, आज मुख्य हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.

 

Visits: 112 Today: 1 Total: 1114204

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *