नेवासा शहर भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर
नेवासा शहर भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा शहर भारतीय जनता पक्षाची नूतन कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये युवा व तळमळीने काम करणार्यांना स्थान देण्यात आले असून शहरातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचाच माझा प्रयत्न राहणार आहे. यासाठी लढा उभा करणार असल्याचा निर्धार शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी व्यक्त केला.
![]()
यावेळी ओबीसी मोर्चाचे संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, नगरसेवक सुनील वाघ, माजी सरपंच सतीष गायके, संदीप आलवणे आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीमध्ये शहर उपाध्यक्षपदी राजेश कडू, ज्ञानेश्वर टेकाळे, तय्युब शेख, हिरामण डुकरे यांची निवड करण्यात आली असून सरचिटणीसपदी आप्पासाहेब गायकवाड, चित्तरंजन हापसे, कोषाध्यक्षपदी सतीष लगे, सहकोषाध्यक्षपदी संजय गवळी, चिटणीसपदी बाबासाहेब दगडे, कृष्णा डहाळे, शरद पंडुरे, विठ्ठल लोखंडे, योगेश दांडाईत, नानासाहेब संगपाळ, महेश लबडे, भरत राजगिरे, प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल परदेशी, सहप्रसिद्धी प्रमुखपदी आकाश गायकवाड, कार्यकारिणी सदस्यपदी निवृत्ती बर्डे, नानासाहेब शेंडे, प्रवीण दारूंटे, लक्ष्मण दाणे, संतोष पंडुरे, मंजाबापू नजन, विलास बोरुडे, रोहित पवार, आकाश कुसळकर, रावसाहेब लहिरे, बाळासाहेब शिंदे, सुधाकर टेकावडे, अनिल गायके, तान्हाजी गायकवाड, महेश जामदार, राजेंद्र कातोरे, राजेंद्र परदेशी, शफीक शेख, निमंत्रित सदस्यपदी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर कणगरे, संजीव शिंदे, सतीष गायके, मुक्तार शेख, डॉ.लक्ष्मण खंडाळे, सुनील वाघ, राजेंद्र मुथ्था, सचिन नागपुरे, राजेंद्र मापारी, संदीप आलवणे यांची निवड करण्यात आली असल्याचे शहराध्यक्ष पारखे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, गटनेते नगरसेवक सचिन नागपुरे यांनी अभिनंदन केले आहे.

