राहाता पालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा!

राहाता पालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा!
उर्दू शाळा उध्वस्त प्रकरण; नेवासा तहसीलदारांकडे मुस्लीम समाजाची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
राहाता येथील मुस्लीम ईदगाह हद्दीतील उर्दू शाळा उध्वस्त करणार्‍या पालिकेतील अधिकारी व पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नेवासा येथील मुस्लीम समाजाचे युवा नेते इम्रान दारुवाले यांनी केली आहे. शिवाय या घटनेचा आम्ही सर्व मुस्लीम समाज निषेध करत असल्याचेही दारुवाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.


नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात इम्रान दारुवाले यांनी म्हंटले आहे की, दि.29 सप्टेंबर, 2020 रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली राहाता येथील पालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांनी उर्दू शाळा उध्वस्त केली. सदरची शाळा उध्वस्त केल्याने विद्यार्थ्यांचे सर्व दस्तावेज, राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा, धार्मिक ग्रंथ खराब झाले आहेत. पालिकेने केलेली सदरची कार्यवाही ही चुकीच्या पद्धतीची असून राहाता येथील मुस्लीम बांधवांनी देखील या घटनेचा निषेध करून अधिकारी व पदाधिकार्‍यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. त्या मागणीला नेवासा येथील मुस्लीम समाज बांधवांचा पाठिंबा असून शासनाने या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी दारुवाले यांनी निवेदनातून केली आहे.


या निवेदनावर जाकीर शेख, मुन्ना अत्तार, अल्ताफ पठाण, अब्बास बागवान, असीर पठाण, इम्रान पटेल, शोएब पठाण, सोहेल सय्यद, अमीन शेख, नासीर इनामदार, शाहरुख शेख, अफिज पठाण, असीफ पठाण, तौसिफ शेख, आलम पिंजारी, नसिरुद्दीन पटेल, शोएब पटेल, सोहेल शेख, पप्पू देशमुख, शाहरुख पठाण, सद्दाम सय्यद, जब्बार पिंजारी, अल्ताफ शेख आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 133 Today: 1 Total: 1422449

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *