‘एसएमबीटी’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र दंतरुग्णांनी तत्काळ हॉस्पिटलला भेट देण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणार्या दंत उपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिलेली नाही.

दंत उपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, आता सोप्या पद्धतीने आणि कमी कालावधीत हे उपचार करता येणे शक्य झाले आहे. दातांच्या आजारात प्रामुख्याने दाताला लागलेली कीड, दात दुखणे, हिरड्यांचा आजार आदिंचा समावेश होतो. रूट कॅनॉल, दात काढणे, अक्कलदाढा काढणे, जबड्याच्या आणि हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच व्यसनांमुळे होणार्या दातांच्या आजारावर देखील उपचार केले जात आहेत. वेडेवाकडे दात असणे किंवा दात एकमेकांत बंद न होणे अशा दातांमुळे रुग्णाला ते साफ किंवा निरोगी ठेवणे अवघड होते. त्यामुळे दात किडण्याचे व हिरड्यांचा त्रास होण्याचा धोका बळावतो.

विशेष म्हणजे, वेदना देणारी दातांची शसक्रिया आता लेझरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होत असून दातांच्या मुळाशी असणारा संसर्ग शंभर टक्के नष्ट करण्यात यश येत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी दंत महाविद्यालय व दवाखान्यात रुग्णांचा तपासणीसाठी आणि शस्रक्रियांसाठी कल वाढला आहे.

किडलेले, तुटलेले दात असतील, मुख दुर्गंधी जाणवत असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडात जखमा आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. दातांचे दुष्परिणाम चेहर्याच्या स्नायूंवर, जबड्यावर, डोकेदुखी, मानेचे आजार किंवा पाठदुखी यावरही दिसू शकतात. त्यामुळे दातांचे दुखणे अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्यावेत.
– डॉ किरण जगताप, अधिष्ठाता
