दीपक बर्डेच्या मृतदेह तपासाठी पोलीस अधीक्षक सरसावले नेवासा तालुक्यातील गावांना भेटी देऊन तपासाबाबत केल्या सूचना

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर येथील तरुण दीपक बर्डे याच्या मृतदेहाची गोदावरी नदीत सुरु असलेल्या शोधमोहिमेला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.

गुरुवारी (ता. 15) दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासमवेत नेवासा तालुक्यातील रामडोह, वरखेड, प्रवरासंगम, गोपाळपूर गावांना भेट देवून तपासाबाबत माहिती घेतली. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांची चर्चा करून शोधमोहिमेबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी रामडोहचे सरपंच ज्ञानदेव बोरुडे, पोलीस पाटील संतोष भुंगासे, ज्ञानेश्वर भंडारी, अशोक बोरुडे, कचरू परसय्या व ग्रामस्थ उपस्थित होते.

भोकर येथील तरुण दीपक बर्डे नोकरीसाठी पुण्याला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो गायब आहे. याच घटनेच्या तपासासाठी भाजपचे नेते आमदार नीतेश राणे यांनी श्रीरामपूर येथे आक्रोश मोर्चा काढला होता. मुस्लिम तरुणीशी विवाह केल्याच्या प्रकरणातून त्यास मारहाण करून त्याचा मृतदेह कमालपूर येथील गोदावरी नदीत टाकल्याची कबुली सात आरोपींनी दिल्यानंतर आठ दिवसांपासून कमालपूर ते पैठणपर्यंत दहाहून अधिक स्पीड बोटींद्वारे मृतदेह शोधमोहीम सुरु आहे. परंतु, अद्यापही मृतदेह हाती लागला नाही. यापार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पीड बोट पथकास तपासाबाबत सूचना केल्या आहेत.

Visits: 14 Today: 1 Total: 83395

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *