बेलापूर ग्रामपंचायतसमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन किमान वेतनासह विविध मागण्या सोडविण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी बाळासाहेब सुरूडे, राजेंद्र बावके, जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख आदी उपस्थित होते.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात यूनियनचे सरचिटणीस जीवन सुरूडे यांनी म्हटले की, मागील आंदोलनात दिलेल्या लेखी आश्वासनानुसार ग्रामपंचायत कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, वेतन 10 तारखेच्या आत जमा करावे, थकीत फंडाचे हफ्ते तातडीने भरणे, ग्रामपंचायतीतील सर्व कामगारांचे भविष्य निर्वाह निधी नाशिक येथे खाते उघडणे यासह विविध मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी. याकरिता ग्रामपंचायतील सर्व विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेे आहेत.

सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे आदिंनी प्रश्नाबाबत संघटनेशी चर्चा केली. परंतु समाधानकारक तोडगा न निघाल्याने यूनियनने आंदोलन सुरूच ठेवत तातडीने सर्व मागण्या न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

Visits: 330 Today: 1 Total: 2124597

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *