कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार खपवून घेणार नाही! राज ठाकरेंच्या सभेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचा इशारा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरेंच्या औरंगाबाद इथं होत असलेल्या सभेसह राज्यातील राजकीय घडामोडींवर चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट असून पोलिसांनी घातलेल्या अटी योग्य आहेत. सभेच्या माध्यमातून सामाजिक संघर्ष निर्माण होता काम नये, लोकांच्या भावना दुखावता काम नये. मात्र, सभेमुळे कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार खपवून घेणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

राजद्रोहाच्या कायद्यातील अनेक तरतुदींचा दुरुपयोग केला जातो. राजकीय दृष्टीने देखील या कायद्याचा वापर केला जातो हे दुर्दैवी आहे. या कायद्याचा वापर गुन्हेगारांवर करणे योग्य आहे. मात्र, राजकीय दृष्टीने वापर करणे लोकशाहीला मारक असल्याचे म्हणत अशोक चव्हाण यांनी शरद पवारांच्या कायदा रद्द किंवा दुरुस्तीच्या भूमिकेला समर्थन दर्शवले आहे. सध्याचे दूषित झालेले राजकीय वातावरण राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात सामान्य माणसाला स्वारस्य नाही. जनहिताची कामे झाली पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. मात्र, सध्या विरोधकांकडून राजकीय वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे. हा पॉलिटिकल वॉर गँगवॉर होऊ देऊ नका असा सल्ला अशोक चव्हाणांनी विरोधकांसह सत्ताधार्‍यांना दिला आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे आणि एकमेकांच्या घरापर्यंत जाणे हे अशोभनीय असून या राजकीय परिस्थिला सर्वसामान्य लोक कंटाळली असल्याचे देखील चव्हाण म्हणाले.

प्रशांत किशोर हे कधीच एका पक्षासोबत राहिलेले नाहीत. त्यांनी अनेक पक्षांना मार्गदर्शन केलेले आहे. इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये त्यांचा हातकंडा आहे हे नाकारता येणार नाही. काँग्रेसला मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. वरीष्ठ नेतृत्वाला काही गोष्टी पाटल्या नसतील म्हणून त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. मात्र, चांगल्या लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 114012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *