धार्मिक सण-उत्सव आनंदात साजरे करा ः भोर नेवासा येथे शांतता समितीची बैठक संपन्न

नायक वृत्तसेवा, नेवासा
धार्मिक सण-उत्सव आंनदात व शांततेत साजरे करा. त्यासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. तुमच्या रक्षणासाठी पोलीस सक्षम आहेत. मात्र समाजात दुफळी निर्माण होईल अशा अफवांना थारा देवू नका. दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे जगण्यामरण्याईची लढाई आपण बघितलेली आहे आता परमेश्वराने दिलेले आयुष्य गुण्यागोविंदाने हसतखेळत जगा असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांनी केले.

नेवासा येथे शुक्रवारी (ता.29) दुपारी 12 वाजता शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, नायब तहसीलदार किशोर सानप आदी उपस्थित होते. रमजान ईद व अक्षय्यतृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील व शहरातील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना भोर म्हणाल्या, सोशल मीडियातील अफवांमुळे वातारण दूषित करु नका. नेवासा गाव हे धार्मिकदृष्या महत्वाचे आहे. या गावात जातीय तेढ निर्माण करुन धार्मिक शहराची ओळख वेगळ्या मार्गाने होईल असे वर्तन करु नका. येणारे सण-उत्सव मोठ्या आनंदात साजरे करुन जातीय सलोखा वाढीस लावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी नेवासकरांना केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पारखे, आरिफ शेख, यूसुफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सण-उत्सवासाठी भोंग्यांची रीतसर परवानगी पोलिसांकडून दिली जाईल. परवानगीशिवाय विनापरवाना सण-उत्सवात मिरवणुका काढू नका असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र मापारी, मंगल सावंत, मंगल शेजूळ, रवींद्र पिंपळे यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील या बैठकीस मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Visits: 12 Today: 1 Total: 82662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *