निलम खताळ यांची साकुरच्या उर्दु शाळेला भेट

नायक वृत्तसेवा, साकूर
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळेस आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. यावेळी निलम खताळ यांनी संगणक कक्षाचीही पाहणी केली. साकूर येथे जि.प.च्या उर्दु प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग असुन ९ वीचे वर्ग सुरु करण्याची मागणी या वेळी स्थानिकांनी केली.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रौफ शेख यांनी यासाठी आमदार अमोल खताळ व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन जि.प.कडे पाठपुरावा सुरु केला आहे.निलम खताळ यांनी या शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी निलम खताळ यांचे उत्साहात स्वागत केले. शाळेसाठी आवश्यक ते सहकार्य भविष्यात नेहमी देऊ अशी ग्वाही निलम खताळ यांनी यावेळी दिली.

तसेच शेंडेवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी रौफ शेख, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, सुभाष पेंडभाजे, संदीप खिल्लारी, सुभाष भुजबळ, अझहर पटेल, तुषार पेंडभाजे, मुख्याध्यापिका तब्बसुम शेख, शिक्षिका शाहिदा चौगुले, नफीसा कुरणे व शिक्षक सलीम, मणियार, मुजाहिद शाह उपस्थित होते.

Visits: 92 Today: 1 Total: 1110651
