मोफत शस्त्रक्रियेंतर्गत झाल्या 71 शस्त्रक्रिया रुग्णांनी मानले रोटरी नेत्र रुग्णालयाचे आभार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात तिरळेपणा निवारणासाठी नुकतेच शिबीर संपन्न झाले. शुक्रवारी (ता.15) ते सोमवारपर्यंत (ता.18) हे शिबिर सुरु होते. संगमनेर रोटरी क्लब अंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टचे दर्शन नेत्र रुग्णालय व पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती अहमदनगर, संगमनेर नगरपरिषद, पंचायत समिती संगमनेर-अकोले शिक्षण विभाग आदी संस्थांचा सहभाग होता. यावेळी अहमदनगर जिल्हा व संपूर्ण राज्यातून रुग्ण तपासणी करण्यासाठी आले होते. यामध्ये 15 एप्रिलला 281 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून 71 रुग्णांवर 16 व 17 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील काही रुग्णांना सोमवारी (ता.18) सकाळी घरी सोडण्यात आले.

रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सर्व दिवस मोफत अल्पोपहार, जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 50 ते 70 हजार रुपये खर्च येतो, या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. शस्त्रक्रिया करु न शकणार्‍या रुग्णांसाठी रोटरीच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या शिबिराची सुरुवात दाते शैला पडतानी यांच्या हस्ते फीत कापून झाली. यावेळी युवक प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे, विशाल पडतानी, स्वाती विशाल पडतानी, श्रीगोपाल पडतानी व रोटरी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरास आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, देणगीदार ललिता मालपाणी, सुवर्णा मालपाणी, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजकुमार जर्‍हाड आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची, डॉ. संदीप होन, डॉ. बापूसाहेब काकड, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय शिंदे, डॉ. अजिंक्य म्हसे, भूलतज्ज्ञ डॉ. किशोर गाढवे, डॉ. विनीत सुखटनकर, डॉ. अनिकेत कासार, डॉ. रसीका वाघोलीकर, डॉ. मोहना देशमुख आदिंनी सहकार्य केले. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 18 तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टिमने सलग दोन दिवस या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे त्यांनी या शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठलेही मानधन घेतले नाही. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे हे 176 वे तर रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने हे 4 थे शिबिर होते. शिबिर यशस्वीततेसाठी रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष संजय राठी, सचिव संजय लाहोटी, रोटरी आय केअरचे उपाध्यक्ष रवी पवार, खजिनदार दीपक मणियार, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, सचिव हृषीकेश मोंढे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, प्रकल्पप्रमुख दिलीप मालपाणी, प्रकल्पप्रमुख अजित काकडे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, सचिव राजेश पवार सर्व रोटरी क्लब सदस्य, रुग्णालयातील डॉक्टर्स सर्व कर्मचारी आदिंनी मेहनत घेतली.

आम्हाला देवदूतच भेटले…
मुलाच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया करण्याइतकी आमची आर्थिक परिस्थिती नाही. परंतु रोटरी नेत्र रुग्णालयामार्फत घेण्यात आलेल्या या शिबिरामुळे आमच्या मुलाचा तिरळेपणा आज नाहीसा झाला. तेही कुठलाही आर्थिक खर्च न करता. रोटरी सदस्यांच्या रुपाने आम्हांला देवदूतच भेटले आहेत. रोटरीचे ऋण आम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही.
– भारती अभंग (पालक)

Visits: 157 Today: 2 Total: 1592399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *