शिर्डीत संघाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांचा निषेध भाजप ओबीसी मोर्चाने ‘जोडे मारो’ आंदोलन करत प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, राहाता
वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी देशातील वातावरण दूषित करून प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराविषयी वादग्रस्त वक्तव्य क्रूर आतंकवादी संघटना तालिबानशी तुलना केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध देशभरात विविध शहरात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्यावतीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा देशविघातक प्रवृत्तीला आळा घालत जेलमध्ये बंद करावे ही मागणी सोमवारी (ता.6) शिर्डीच्या प्रांतधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराला सातत्याने बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा कुटील डाव जावेद अख्तर यांच्याकडून होत असतो, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भाजप ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने यांनी केले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, देशावर आलेले कुठलेही राष्ट्रीय किंवा नैसर्गिक संकट मग ते भूकंप, त्सुनामी, महापूर असो वा मनावतेवर आलेले संकट ते सोडवण्यासाठी आदेशाची वाट न पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराचे कार्यकर्ते सर्वप्रथम त्या विपदास्थळी उपस्थित होतात व देशावर आलेले संकट संपत नाही तोपर्यंत संघ स्वयंसेवक आपले पाय रोवून उभे असतात. जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी, देशभक्त अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांची तुलना मानवतेला कलंक असलेल्या तालिबान या आतंकवादी संघटनेबरोबर करणार्‍या जावेद अख्तर यांच्या अतिशय निंदनीय वक्तव्याचा निषेध भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच जावेद अख्तर यांच्या प्रतिमेले जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन देण्यात आल्याचे शेवटी म्हणाले.

या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, रवींद्र गोंदकर, रमेश बिडये, जिल्हा संयोजक राजेश शर्मा, युवा मोर्चा शहरध्यक्ष योगेश गोंदकर, माजी नगरसेवक किरण बर्डे, युवा मोर्चाचे गणेश जाधव, नरेश सुराणा, सोमराज कावळे, साईराज कोते, जिल्हा सरचिटणीस सचिन भैरवकर, ओबीसी संपर्क प्रमुख वैभव शिंदे, नितीन वाके, सुनील भुजाडे, सरचिटणीस भीमराज मुर्तडक, उपाध्यक्ष योगेश शिंदे, बद्रीनाथ वाघचौरे, चेतन कोते, प्रसाद शेलार, अक्षय मुळे, सोमनाथ शिंदे, विजय कोळपकर, दत्तात्रय झाकणे, रोहित सोळंकी, आनंद बुधेकर, सुनील गोर्डे, तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय महाजन तसेच भाजप व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन यशस्वीतेसाठी भाजप ओबीसी मोर्चाचे वैभव शिंदे, नितीन वाके, विजय रहाते यांनी विशेष प्रयत्न केले तर शेवटी संजय महाजन यांनी आभार मानले.

Visits: 93 Today: 1 Total: 1419873

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *