जागतिक अफरातफरीतूनच देशांचा विकास दर ठरतो : करंजीकर कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या तिसर्‍या दिवशी जागतिक घडामोडींवर पडला प्रकाश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने असंख्य अफरातफरी केल्या, अशा अफरातफरीतूनच विकासाचा दर ठरविण्यात येतो. देशाचा विकास दर (जीडीपी) म्हणजे आकड्यांचाच खेळ आहे. जगातील प्रत्येक देशातील समाज जसा असेल तसाच आकड्यांचा खेळ केला जातो. आजही जगातील अनेक देशांकडे कुत्सित नजरेने पाहीले जाते, खरेतर हिच सर्वात मोठी अफरातफर आहे. त्याची पाळेमुळे अमेरिकेत रुजलेली आहेत. जगातील कोणत्याही देशात अटींशिवाय गुंतवणूक होत नाही, त्यामुळे अर्थकारणांचा सतत मागोवा घ्यावा लागतो असे मत व्यवस्थापन तज्ज्ञ व लेखक दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे तिसर्‍या दिवसाचे पुष्प गुंफताना ‘जागतिक अफरातफर व त्याची पाळेमुळे’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्पप्रमुख अरुण ताजणे, सेक्रेटरी जसपाल डंग, अनिल राठी आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात पुढे बोलताना करंजीकर म्हणाले की, जगात दररोज घडणार्‍या अशा अफरातफरी सर्वसामान्य लोकांना समजावून सांगितल्या पाहिजेत. देशाच्या देशाच्या अर्थकारणाशी निगडित असलेल्या अशा गोष्टींचा संबंध थेट सामान्यांशी असतो, त्यामुळे जगात घडणार्‍या अशा अफरातफरी वरकरणी आपल्याशी संबंधित नसल्याचे भासत असले तरीही आजच्या स्थितीत त्या थेट आपल्या दारापर्यंत पोहोचल्या असून आपण सर्वांनीच अधिक सजगतेने वावरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आपल्या व्याख्यानात जागतिक घडामोडींवरील अनेक दाखले देतांना करंजीकर यांनी अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याचा आणि एन्रॉनचा आपल्याशी थेट संबंध नाही असे प्रत्येकाला वाटते, मात्र वस्तुस्थिती तशी नसून आपण सर्वजण जगातील एका विशिष्ट यंत्रणेत अडकून राहीलो आहोत. जगात घडणार्‍या अशा घटनांशी आपला संबंध नाही असे आपल्याला सहज वाटते, मात्र हा केवळ भ्रम असून जागतिक पातळीवर घडणार्‍या अशा असंख्य अफरातफरी आता थेट आपल्या दाराशी पोहोचल्याचे ते म्हणाले.

जगात घडणार्‍या अशा अफरातफरींचा सामान्यांशी असलेला थेट संबंध स्पष्ट करताना करंजीकर यांनी कोरोनाचे उदाहरण देतांना चायनामधील व्युहान शहरातील प्रयोगशाळेत कोविड नावाचा व्हायरस तपासणीसाठी दिला गेला, चायनाने मात्र जगावर वर्चस्व मिळविण्यासाठी या व्हायरचा वापर केला. आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या वुहान शहरातील हा व्हायरस जगातील सर्व देशांमध्ये पोहोचला ही चालू स्थितीतली सर्वात मोठी अफरातफर असून जगात हाहाकार उडवूनही जागतिक आरोग्य संघटनेचे चायनाच्या बाबतीतले मुगगिळे धोरण जागतिक अफरातफरीचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Visits: 12 Today: 1 Total: 115762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *