अकोले शहर शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी कानवडे

नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर नगर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शिवसेना अकोले शहर कार्याध्यक्षपदी गणेश कानवडे यांची निवड करण्यात आली आहे.

याबरोबरच शहर संघटकपदी अमोल पवार, शहर उपप्रमुख पदी सूरज नाईकवाडी, बाळासाहेब धुमाळ, मिलिंद रुपवते व सागर राऊत यांची देखील निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियानांतर्गत अकोले शहर शिवसेनेची आढावा बैठक अकोले शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अकोले शहर शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करून शिवसैनिकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, नगरसेवक प्रमोद मंडलिक, उपशहरप्रमुख बाळासाहेब धुमाळ, सुनील गिते यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
