‘साई किराणा मॉल’चा गुरुवारी होणार शुभारंभ

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे गुरुवारी (ता.26) सकाळी 9 वाजता ‘साई किराणा मॉल’ या अद्ययावत दुकानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मालक उत्तम कुदनर यांनी दिली आहे.

साई किराणा मॉलचा शुभारंभ दत्तगिरी महाराज, सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, नाशिक विभागीय वनाधिकारी यशवंत केसकर, उपसभापती नवनाथ अरगडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, अंभोरेचे सरपंच भास्कर खेमनर, सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, बाजार समितीचे संचालक रावसाहेब खेमनर, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, माजी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. अशोक हजारे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर किशोर खेमनर, मांडवे बुद्रुकचे माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, अभिषेक कृषी उद्योग समूहाचे मल्हारराव सोन्नर, प्रगतिशील शेतकरी रुपेश धूळगंड, संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे लक्ष्मण कुदनर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या शुभारंभ प्रसंगी हितचिंतक आणि ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तात्याभाऊ कुदनर, उत्तम कुदनर, रामदास कुदनर व अरुण कुदनर यांनी केले आहे. या अद्ययावत दालनातून ग्राहकांना नामांकित कंपन्यांचा निवडक व स्वच्छ किराणा माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 1589123

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *