टिळकनगर परिसरातून दीडशे किलो गोमांस पकडले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहराजवळील टिळकनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीत गोवंश जनावरांची कत्तल करताना विक्री करताना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे 21 हजार रुपये किंमतीचे 150 किलो गोमांस हस्तगत करुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टिळकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीत बेकायदेशीररित्या गोमांस विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोते यांना बरोबर घेवून छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी फिरोज मुसा कुरेशी (वय 45) यास ताब्यात घेवून त्याच्याकडून सुमारे 21 हजार रुपये किंमतीचे 150 किलो गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले.

याप्रकरणी पोलीस शिपाई संभाजी खरात यांनी फिर्याद दाखल केली आली असून गुरनं. 979/2022 प्रमाणे फिरोज कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5, 5अ, ब, 9अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक राशिनकर हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, साईनाथ राशिनकर, मच्छिंद्र शेलार, पोलीस शिपाई बाळासाहेब गुंजाळ, संभाजी खरात यांच्या पथकाने केली आहे.
