सलगर यांना धमकी देणार्यावर कारवाई करा! अकोले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी अकोले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना भ्रमणध्वनीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पडळकर समर्थकाने धमकी दिली आहे. सदर व्यक्तीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे एका पदाधिकारी तरुणीस अपमानास्पद व लज्जास्पद भाषेत बोलणे हा गुन्हा असून संबंधितावर कठोर कारवाई अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रभात चौधरी, शहर कार्याध्यक्षा अक्षय आभाळे, युवक चिटणीस नवनाथ पांडे, शहराध्यक्ष पीयूष पंजाबी, रितेश चौधरी, हरिदास तांबोळी, वैभव कर्णिक आदी उपस्थित होते.
