अकरा गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी केली सुटका


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या भयावह संकटातही अवैध धंदे चालूच असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. शहरातील भारतनगरमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या अकरा गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली आहे. सदर कारवाई बुधवारी (ता.7) रात्री आठ वाजेच्या सुमारास केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतनगर येथील मुस्तफा अहमद कुरेशी याने 10 गोर्‍हे व एक गाय असे अकरा गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाड्यात निर्दयीपणे बांधून ठेवलेले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला असता सव्वा लाख रुपयांची जनावरे मिळून आली. त्यांची सुटका करत मुस्तफा कुरेशी याच्याविरोधात पोलीस शिपाई सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.351/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 अ, 1, 9, सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार रफीक शेख हे करत आहे.

Visits: 144 Today: 1 Total: 1870425

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *