राष्ट्रीय रोपस्किपींग स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे सुयश! नाशिकमध्ये पार पडल्या स्पर्धा; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिकमध्ये झालेल्या २४ व्या राष्ट्रीय रोपस्किपींग अजिंयपद स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळांडूनी नेत्रदीपक कामगिरी करताना चार सुवर्णसह २४ पदकांची कमाई केली. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेली ही स्पर्धा हौशी रोपस्किपींग असोसिएशन व नाशिकच्या क्रीडा भारती यांनी संयुतपणे आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील आठशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. केंद्रीय आरोग्य व कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत अकरा वर्षांखालील गटात खेळताना ध्रुव ग्लोबलच्या विश्वजीत दरंदले, आर्य शेणकर यांनी रौप्य तर, ईशान उपाध्ये, सोहम पांडुले व शर्वरी हांडे यांनी कांस्यपदके मिळवली. १४ वर्षांखालील गटात प्रेम पवार, प्रिंस पवार, आरव बकाल आणि सोहम करपे यांनी सुवर्णपदकांसह कांस्यपदकेही पटकावली. तर याच गटात प्रणव काकडे, प्रिंस पवार, पुष्कर बकाल यांनी रौप्य आणि आयुष धायगुडे याने रौप्यसह कांस्यपदक मिळवले.

सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात वैदेही झारगड, इशिता बियाणी आणि राशी टोकसे या खेळाडूंनी प्रत्येकी दोन कांस्यपदकांची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करताना संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी चार सुवर्ण, सहा रौप्य व चौदा कांस्यपदकांसह एकूण २४ पदके प्राप्त केली. केंद्रीय आरोग्य व कल्याण मंत्री डॉ. भारती पवार व असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या यशाबद्दल ध्रुवचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागप्रमुख गिरीश टोकसे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 114942

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *