परिवार सुपर बझार’च्या अकोले रोड शाखेचा दिमाखात शुभारंभ मोठ्या शहरांतही शाखा सुरू करण्याचा दिवटे परिवाराचा मनोदय
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वर्गीय सूर्यभान दिवटे आणि मातोश्री वंदना दिवटे यांनी किराणा व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करत लौकिक मिळविला आहे. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे सुपूत्र रमेश दिवटे आणि माजी नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे या दोघा बंधूंनी किराणा व्यवसायात जम बसविला आहे. नव्यानेच अकोले रोडवर अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त परिवार किराणा बझार शाखेचा बुधवारी (ता.7) दिमाखात शुभारंभ केला आहे.
प्रारंभी शहरातील सय्यद बाबा चौकात किराणा व्यवसायाची मुहूर्तमेढ दिवटे परिवारातील स्व.हरिभाऊ महादू दिवटे यांनी रोवली. त्यानंतर त्यांचे सुपूत्र स्व.सूर्यभान दिवटे व स्व.वंदना दिवटे यांनी व्यवसाय नेटाने पुढे नेला. आता तिसरी पिढी व्यवसायात आली असून, रमेश आणि सोमेश्वर या दोघांनी किराणा व्यवसायात वेगळा ठसा उमटवला आहे. सन 1978 मध्ये मालदाड रोडवर ‘दिवटे किराणा’ दुकान उघडले होते. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिवटे परिवारावर मायेचा हात ठेवत उभारी देण्याचे काम केले.
याच बळावर रमेश दिवटे व युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे या दोघा बंधूंनी सन 2015 मध्ये आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गणेशनगरमध्ये परिवार सुपर बझार नावाने दुसरी शाखा सुरू केली. तेथे ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता घेऊन अकोले रोडवर पाच हजार स्क्वेअर फूट जागेत अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त तिसरी शाखा सुरू केली आहे. यामध्ये रमेश दिवटे यांच्या पत्नी सुनीता व चिरंजीव ओम यांचे मोलाचे योगदान आहे.
मोठ्या शहरांतही शाखा सुरू करणार!
संगमनेर शहरात परिवार किराणा बझारच्या तीन शाखा झाल्या आहेत. त्यानंतर आता संगमनेरच्या बाहेर मोठ्या शहरांमध्ये लवकरच शाखा सुरू करण्याचा मनोदय किराणा व्यावसायिक रमेश दिवटे व सोमेश्वर दिवटे यांनी व्यक्त केला आहे.