लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी सुनीता पगडाल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची गेल्या 43 वर्षांची परंपरा असलेल्या लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी सुनीता पगडाल यांची नुकतीच निवड झाल्याची माहिती लायन्स क्लब संगमनेरचे क्लब नॉमिनेशन कमिटी चेअरमन ललित देसाई यांनी दिली आहे.

लायन्स क्लब ऑफ संगमनेर ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. लायन्स क्लब ऑफ संगमनेरने परिसरात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम, आरोग्य शिबिरे राबविलेली आहेत. पगडाल या गेली 15 वर्षे लायन्स क्लबमध्ये सक्रीय कार्यरत असून विविध सेवा उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. तर क्लबच्या सचिवपदी राखी करवा, खजिनदारपदी पूनम मुंदडा, प्रशासकीय अधिकारीपदी पूनम राजपाल, प्रथम उपाध्यक्ष वैभव शहा, द्वितीय उपाध्यक्ष राजेंद्र लगे यांचीही निवड करण्यात आली आहे. सदर निवडींबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राजेंद्र सोमाणी, ओंकारनाथ भंडारी, हिरालाल पगडाल, किशोर सस्कर, विभागीय चेअरमन संतोष मानकेश्वर, झोन चेअरमन श्रीनिवास पगडाल, राणीप्रसाद मुंदडा, डॉ. राजन ठाकूर, सत्येन मुंदडा, केदारनाथ राठी, ललित देसाई, एम.जे.एफ. डॉ. सूचित गांधी, प्रकाश कलंत्री, राजेश लाहोटी, विलास क्षत्रिय, संदीप जाजू, डॉ. अमोद कर्पे, राजेंद्र काजळे, चंद्रकांत एनगंदूल, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, सीताराम राऊत, राजाभाऊ अवसक, चांगदेव खेमनर, डॉ. अबोली गांधी, संतोष करवा, वैभव शहा, बाळासाहेब देशमाने, शिरीष तिवारी, चंद्रशेखर झुंजूर, गणेश मादास आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 149 Today: 1 Total: 1955497

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *